प्रतिनिधी
औरंगाबाद : अय्यप्पा स्वामींच्या भक्तांसाठी विशेष रेल्वे धावणार असून, ती ७ डिसेंबर रोजी औरंगाबादहून निघून कोलमला पोहचणार आहे. मराठवाडा रेल्वे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी या गाडीची मागणी केली होती.
ख्रिसमसच्या काळात औरंगाबादहून गोवा, औरंगाबाद- कोलम (शबरीमल्यम) येथे विशेष रेल्वेगाडी सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानुसार ७ व २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.१५ वा. ही रेल्वेगाडी सुटेल. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, मल्काजगिरी, काचीगुडा, महेबूबनगर, कर्नूल, रेनीगुंठा, तिरुपती, चित्तूर, काटपाडी, जलरामपेठ, सेलम, इरोड, कोईम्बतूर नॉर्थ, कोईम्बतूर जंक्शन, एर्नाकुलम, कोलम व याच मार्गाने परत औरंगाबाद असा या गाडीचा प्रवास राहील. या गाडीचे आरक्षण सुरू झाले आहे.