मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची
मन गुरू आणि शिष्य, करी आपुलेंचि दास्य
प्रसन्न आपआपणास, गति अथवा अधोगती
साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते ऐका मात
नाही नाही आनुदैवत, तुका म्हणे दुसरे
- संत तुकाराम महाराज
तुम्ही आपलं मन प्रसन्न करा. त्याला नेहमी प्रसन्न ठेवा. सगळ्या चांगल्या गोष्टी मिळण्याचं, सगळं साध्य होण्याचं कारण मन आहे. आपण मोकळं होणं, आपल्याला सुख होणं, आपण कोणत्याही बंधनात अडकणं, आपण समाधी होणं या सगळ्या मनाच्याच इच्छा आहेत. दगडाच्या स्थापना केलेल्या मूर्तीत देव असतो ही कल्पना मनानंच केली. मी या दगडाच्या देवाचा भक्त आहे. अशी कल्पनासुद्धा मनानंच केली. आता त्या दगडाची पूजा करणं म्हणजे खरे पाहता मनानंच मनाची पूजा केली, असं होतं. सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारं मनच आहे. मन हे सगळ्यांची आई आहे. मनच गुरू आहे. मनच शिष्य. म्हणजेच आपणच आपले गुरू आणि आपणच आपले शिष्य होतो. आपली सेवा आपणच करतो. मनामुळंच आपलं चांगलं किंवा वाईट होत असतं. साधकांनो, वाचकांनो, पंडितांनो, श्रोत्यांनो, वक्त्यांनो तुम्ही माझी ही गोष्ट ऐका, की मनाशिवाय दुसरं दैवत नाही म्हणजे नाहीच.
तात्पर्य : मन हेच आपलं सगळं काही आहे. मनाशिवाय दुसरं दैवतच नाही, तर असं असताना आपण इतर ठिकाणी देव आहे, असं समजून त्यासाठीची लागणारी कर्मकांडं का करायची? आणि प्रयत्न करायचे सोडून चमत्कार व अंधश्रद्धा यावर विश्वास का ठेवायचा? या मनाचा उपयोग चांगल्यासाठी न करून घेता, वाईट विचारानं आपण आपलंच नुकसान करून घेत असतो.
- विजय गवळी