प्रतिनिधी
औरंगाबाद : शिक्षकाकडून ८०० रुपये लाच घेताना वडोदबाजार ठाण्याच्या पोलिस हवालदाराला रंगेहात पकडण्यात आले आहे.
शिक्षक प्रभाकर भगवानराव तळेकर यांची भाची योगिता आणि तिच्या सासरच्या मंडळीत वाद सुरू आहे. या प्रकरणी जालना येथील महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दाखल आहे. या केंद्राने योगिताचे पती आणि अन्य लोकांना नोटीस बजावण्यासाठी वडोदबाजार (ता. सिल्लोड) पोलिस ठाण्यास पाठविली होती. ही नोटीस पोकॉ विठ्ठल गंगाधर दाभाडे यांच्याकडे आली. प्रभाकर तळेकर यांनी दाभाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांना ८०० रुपये मागितले. पैसे फुलंब्री बसस्थानकासमोरील राज रेस्टॉरंटमध्ये घेऊन येण्यास सांगितले. प्रभाकर तळेकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाभाडेविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी साध्या वेशात सापळा लावून दाभाडे यांना लाच घेताना पकडले.