प्रतिनिधी
औरंगाबाद : मोक्का कायद्याखाली अटक केलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या प्रकरणी पोलिस आयुक्तांनी सहायक फौजदारासह चार जणांना निलंबित केले आहे.
मुख्यालयातील सहायक फौजदार डी. एम. बाडिया, जमादार एन. जे. राठोड, कॉन्स्टेबल के. एम. सोनटक्के, जी. ए. शेळके अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. विजय सर्जेराव बडे (२४, रा. सिंधपूर, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), त्याचे साथीदार दीपक दत्तात्रय जावळे आणि अभय भास्कर पोहरे (रा. अहमदनगर) यांना अहमदनगर पोलिसांनी मोक्का कायद्याखाली अटक केली होती. हे आरोपी हर्सूल तुरुंगात होते. न्यायालयात त्यांची २१ नोव्हेंबरला तारीख असल्याने औरंगाबाद पोलिस त्यांना घेऊन नगरला गेले होते. परत आणताना ही घटना घडली होती.