प्रतिनिधी
औरंगाबाद : थंडीची चाहूल लागताच ग्राहकांची बाजारात सुका मेवा घेण्यासाठी गर्दी वाढत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सुका मेवा २० टक्क्यांनी महागला असल्याची माहिती सुकामेवा विक्रेत्यांनी दिली. थंडीला सुरुवात झाली असल्याने बाजारात विविध प्रकारचे डिंकाचे लाडू, बदाम, काजू, किसमिस, पेंड खजूर, खारीक, खोबरे, मनुके बाजारात उपलब्ध झाले असून ते घेण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत. यावर्षी सुका मेवा २० टक्क्यांनी महागला असल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. काजू, बदामची किंमत मागील वर्षीच्या तुलनेत २०० रुपयांनी महागली असून ५०० रुपये प्रति किलोने विकले जात असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे किसमिस १५० रुपये प्रतिकिलो, अंजीर ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो असून पेंड खजूर १२० रुपये, खारीक ८० रुपये प्रतिकिलो, गोंडबी ३८० रुपये प्रतिकिलो. थंडीच्या दिवसात सुध्दा सुकामेव्याला मागणी असते मात्र यावर्षी महागाईचा परिणाम सुकामेव्यावर देखील झालेला दिसत आहे. महागाईमुळे सुकामेव्याच्या विक्रीत घट होईल, असा अंदाजही विक्रेत्यांनी व्यक्त केला.