प्रतिनिधी
औरंगाबाद : दारू पिऊन शिवीगाळ करणाèया वडिलांना मुलानेच ठार केल्याची थरारक घटना मुकुंदवाडीतील राजनगर येथे घडली आहे. पोलिसांनी मुलाला अटक केली असून, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
मधुकर खंडागळे (४५) हे दारूच्या नशेत पत्नी सोजरबाई आणि मुलगा अमोल यांना शिवीगाळ करत होते. त्यावरून अमोल आणि त्यांच्यात जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात अमोलने दगडी वरवंटा मधुकर यांच्या डोक्यात घातला. ते रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडले. सोजरबाई आणि अमोल यांनी स्वत: मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकाराविषयी सांगितले. पोलिसांनी मधुकर खंडागळे यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. रात्री २ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात सोजरबाई यांच्या तक्रारीवरून अमोल खंडागळेवर खुनाचा गुन्हा दाखल केला.