प्रतिनिधी
औरंगाबादः कुख्यात दरोडेखोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हातकडीसह पळाल्याची घटना काल रात्री मिलकॉर्नर परिसरात घडली. विजय सर्जेराव बडे (२४, रा. सिंधपूर, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव असून, तो दरोड्यातील आरोपी आहे.
पोलिसांनी सांगितले, की आरोपी विजय व त्याच्या साथीदार दीपक दत्तात्रय जावळे आणि अभय भास्कर पोहरे (रा. अहमदनगर) यांच्यावर अहमदनगर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. त्यांना हर्सूल कारागृहात ठेवण्यात आले होते. नगर न्यायालयात तारीख असल्याने त्यांना नगरला नेण्यात आले होते. परत आणताना हा प्रकार घडला. पोलिस मुख्यालयातून एखादे वाहन घेऊन आरोपींना हर्सूल तुरुंगात सोडून परत येऊ, असा विचार पोलिसांचा होता. मात्र बसस्थानक ते मिलकॉर्नरदरम्यान अंधाराचा लाभ घेत आरोपी विजयने हातकडीची दोर सोडली आणि तो पळाला. त्याला पाहून अन्य आरोपीही पळून जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांच्या हातात केवळ दोरीच राहिली आणि आरोपींच्या हातात हातकडी. पोलिसांनी आरडाओरड करीत आरोपींचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी दीपक आणि अभय यांच्या हातात एकच हातकडी असल्याने ते जास्त जोरात पळू शकले नाहीत. थोड्या अंतरावर त्यांना पकडण्यात आले. विजय बडे मात्र पळून गेला.