प्रतिनिधी
औरंगाबाद : जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे आयोजित दुसरे जिल्हा मराठा साहित्य संमेलन २२ व २३ डिसेंबर रोजी कृष्णा लॉन्स मार्केट यार्ड, वैजापूर येथे होणार आहे.
२२ डिसेंबर रोजी सायंकाळी सहाला खुले कवी संमेलन होणार असून, कवी संमेलनात जिल्ह्यातील कवींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. ज्या कवींना संमेलनात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपली एक निवडक कविता ३० नोव्हेंबरपर्यंत मध्यवर्ती कार्यालय, देवगिरी प्रिंटर्स, सी- सेक्टर, प्लॉट नं. १७, टाऊन सेंटर, एन १, सिडको, सिडको बसस्टॅन्डच्यामागे पोहोच कराव्यात. यासाठी अजिंक्य मरकड (९४२१५९४११५), अरुण कोकाटे (७५८८६४४२६५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक विजय गवळी, समन्वयक चंद्रकांत बनसोडे, कार्यवाह सुधाकर पवार, संयोजन समिती व जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्ष मा. खा. यशवंतरावजी गडाख राहणार आहेत तर उद्घाटन पद्माकरराव मुळे यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष भाऊसाहेब पाटील चिकटगावकर राहणार आहेत.