पत्नीचा खून प्रकरण
प्रतिनिधी
औरंगाबाद : रॉकेल टाकून पत्नीला जाळून खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला पती हरिश्चंद्र पंडित चौधरी (रा. दोंडाईचा, ता. सिंदखेडा, जिल्हा धुळे) याची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेविरुद्ध हरिश्चंद्रने खंडपीठात शिक्षेविरुद्ध अपील केले होते. सुनावणीअंती न्या. ए. एच. जोशी आणि न्या. यु. डी. साळवी यांनी आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणी पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार आरोपी हरिश्चंद्र (४४) आणि त्यांची पत्नी अंजनाबाई (४०) यांची नेहमी भांडणे व्हायची. एके दिवशी अशीच भांडणे झाली असता हरिश्चंद्रची आई घर सोडून निघून गेली. यामुळे आरोपीने रागात अंजनाबाईच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. यामुळे ती गंभीर भाजली. आरोपी आणि त्याच्या मुलाने आग विझवून तिला रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणीमध्ये ती ९२ टक्के भाजल्याचे निदान झाले. अंजनाबाईचा मृत्यूपूर्व जबाब घेण्यात आला. नंतर तिचे निधन झाले. पोलिसांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीअंती आरोपीला अंजनाबाईच्या मृत्यूपूर्व जबाबाआधारे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेविरुद्ध त्याने उच्च न्यायालय खंडपीठात अपील दाखल केले. यावर सुनावणीदरम्यान हरिश्चंद्रच्या वतीने अॅड. जॉयदीप चटर्जी यांनी म्हणणे मांडले की आरोपीला अंजनाबाईच्या ज्या मृत्यूपूर्व जबाबाआधारे जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली तो मृत्यूपूर्व जबाबच विश्वसार्ह नाही. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी म्हणणे मांडले की अंजनाबाईच्या मृत्यूपूर्व जबाबावर तिच्या अंगठ्याचा ठसा घेण्यात आला. परंतु वैद्यकीय तपासणी अहवालानुसार ती ९२ टक्के भाजली होती आणि त्यातही तिचे दोन्ही हात पूर्णपणे भाजले होते. तिच्या तळहाताची त्वचाही पूर्णपणे निघून आली होती, त्यामुळे मृत्यूपूर्व जबाबावरील तिच्या अंगठ्याचा ठसा संशयास्पद आहे. अंजनाबाई ही मृत्यूपूर्व जबाब देण्याच्या स्थितीत होती, हेही फिर्यादी पक्षाला सिद्ध करता आले नाही. सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान, मृत अंजनाबाईचा मुलगा अक्षय, भाऊ विजय आणि बहीण वंदना यांनी त्यांच्या साक्षीमध्ये अंजनाबाईच्या मृत्यपूर्व जबाबाला पूरक माहिती दिली नाही, त्यामुळे त्यांना फितुर घोषित करण्यात आले. वरील सर्व बाबींचा विचार करुन खंडपीठाने आरोपीला सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द करीत आरोपीची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अॅड. जॉयदीप चटर्जी तर शासनातर्फे अॅड. वाय. एम. क्षीरसागर यांनी काम पाहिले.