प्रतिनिधी
औरंगाबाद : भरधाव इंडिका कार, टाटा सुमो आणि ट्रॅक्टरची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना औरंगाबादजळगाव महामार्गावरील बोरगाव फाट्यावर घडली. जखमींवर औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हरी मगन सोनवणे (४०) रा. खामगाव, ता. फुलंब्री, असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. औरंगाबादकडून जळगावकडे भरधाव जाणाèया एका टाटा सुमोने बोरगाव फाट्यावर समोरून येणाèया ट्रॅक्टरला धडक दिली. याचवेळी बुलडाण्याकडे जाणाèया एका इंडिका कारनेही ट्रॅक्टरला धडक दिली. या तिहेरी अपघातात ट्रॅक्टरवरील हरी मगन सोनवणे (४०), इंडिका कारमधील सुशील रमेश पाटील (२५), रमेश मंगलमूर्ती पाटील (५०) आणि विलास भरत जाधव (३५) सर्व रा. बुलडाणा हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरील नागरिकांनी जखमींना तत्काळ औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविले. तथापि जखमींपैकी हरी सोनवणे यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. अन्य तीन गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.