पोलिसही हैराण, सोन्याची लगड जप्त
प्रतिनिधी
औरंगाबाद : सिडको एन-१ परिसरात जानेवारी महिन्यात घरफोडी झाली होती. त्यातील मुद्देमाल एका विधीसंघर्ष बालकाकडून जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. जवळपास १ लाख ३५ हजार रुपये किंमतीची साडेचार तोळ्याची सोन्याची लगड स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्याकडून ताब्यात घेतली.
पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार पांडे यांना खबèयाकडून गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने सातारा परिसरातील एका घरी या बालकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने सिडको एन-१च्या घरफोडीची कबुली दिली. बालकाने घराच्या दुसèया मजल्यावर राहणारे सुधीर प्रल्हाद पौंधे यांचे घर फोडून सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यानंतर त्याने घनसावंगी येथील एका सोनारास ते सोने विकले. पोलिसांनी या चोरीतील साडेचार तोळ्याची सोन्याची लगड जप्त केली आहे. या बालकास पुढील तपासासाठी एमआयडीसी सिडको पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.