गर्दीचा फायदा घेऊन भुरटे करतील हातसाफ
प्रतिनिधी
औरंगाबाद : दिवाळी खरेदीसाठी बाजारात जात आहोत, पण जरा सावधान रहा. कारण बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेऊन हात साफ करणारे अनेक भुरटे सध्या सक्रीय आहेत. खरेदीसाठी जाताना दागिने घालू नका आणि बालकांच्याही अंगावर दागिने ठेवू नका. बालकाच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट पळविण्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने वेळीच हा प्रकार लक्षात आला म्हणून ठीक अन्यथा लॉकेट गमावून बसावे लागले असते.
राधा काळे (२४) व सुमन भगवान शिंदे (१८) (दोघी रा. रेल्वेस्टेशन परिसर, पैठणरोड) या दोघींनी बेगमपुरा येथील रहिवासी राधाबाई वैष्णव (२५) यांच्या बालकाच सोन्याचे लॉकेट पळवले होते. आईसोबत दिवाळीच्या खरेदीला राधाबाई गुलमंडीवर आल्या होत्या. त्याच वेळी सुपारी हनुमान मंदिरामागून जाताना राधा काळे व सुमन शिंदे यांनी वैष्णव यांना जोराचा धक्का देऊन त्यांचे लक्ष विचलित केले. त्याच वेळी त्या दोन महिलांनी राधाबाई वैष्णव यांच्या कडेवर असलेल्या बालकाच्या गळ्यातील सोन्याचा ओम हिसकावून पळ काढला. ही बाब लक्षात येताच राधाबाई वैष्णव यांनी आरडाओरड केली. तेव्हा बाजारातील सजग नागरिकांनी त्या महिलांचा पाठलाग करून त्यांना पकडले. नंतर सिटीचौक पोलिसांनी त्यांना अटक केली.