प्रतिनिधी
औरंगाबाद : दहावी आणि दहावीनंतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत असून यावर्षीही जिल्हा समाजकल्याण विभागाने 7 लाखांची निधी मंजूर केला आहे.
जिल्ह्यातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा समाजकल्याण विभाग शिष्यवृत्ती योजना राबवित आहे. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी शिष्यवृत्तीचा उपयोग होत आहे. यावर्षी आर्थिक वर्षासाठी जिल्हा समाजकल्याण विभागाने दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी साडेतीन लाख रुपये व दहावीनंतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना साडेतीन लाख रुपये मंजूर करण्यात आला आहे. याबरोबरच जिल्ह्यातील अनुदानीत विनाअनुदानीत खाजगी शांळांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्याप्रमाणे यावर्षीही जिल्हा परिषद विभागाने शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर केली असून लवकरच तिचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी एम. पी. राठोड यांनी दिली.