प्रतिनिधी
औरंगाबाद : रस्त्याने पायी जाणाèया महिलेचे मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पळ काढल्याची घटना बन्सीलालनगरात घडली. गुरूच्या दर्शनासाठी ही महिला चालली होती. मंगळसूत्राची qकमत ७५ हजार रुपये आहे.
रमादेवी कृष्णा मोपुरू (४३, रा. प्राईड टॉवर्स, वेदांतनगर) या बन्सीलालनगर येथील पुंडलिक काका यांच्याकडे चालल्या होत्या. पती कृष्णा मोपुरू यांच्यासोबत कारमध्ये वामन निवास येथे कार आल्यानंतर चालकाने समोर ती उभी केली. कारमधून उतरून त्या घराकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने रमादेवी यांच्या गळ्यातील गंठण हिसकावले. ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. रस्त्यावरील नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान एका तरुणाने दुचाकीवरील एकास पकडले, तेव्हा त्या चोरट्याने या भानगडीत पडशील तर जिवे मारले जाशील, अशी धमकी दिली व त्याच्या हाताला झटका देऊन पळ काढला. चोरट्यांनी रमादेवी यांच्या गळ्यातील २२ ग्रॅमची सोन्याची चेन व ३ ग्रॅमचे पेंडल हिसकावून नेले. क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.