Home » , , » दोन नायजेरियन अटकेत ; ५ मोबाईल जप्त

दोन नायजेरियन अटकेत ; ५ मोबाईल जप्त

Written By Aurangabadlive on बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१२ | ९:३३ PM

प्रतिनिधी
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकाजवळ अटक करण्यात आलेल्या दोन नायजेरियन नागरिकाकडून पाच मोबाईल जप्त करण्यात आले असून मोबाईलमध्ये सांकेतिक नंबरची कसून चौकशी करण्यात येत आहे. एका नायजेरियनच्या विरोधात अमली पदार्थ तस्करीचा मुंबईत गुन्हा दाखल असल्यामुळे त्या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.
मध्यवर्ती बसस्थानकाजवळ दि. २० रोजी सायंकाळच्या सव्वा आठ वाजेच्या सुारास पुणेहून अडव्हिन टोनी सावाझ अडव्हिनटेन (३७, रा.नायजेरिया) व शोलोदेव सम्युअल (२६, रा.नायजेरियन) ही दोघे औरंगाबाद शहरात दाखल झाले. ते रिक्षात बसून जालना रोडवर फिरताना संशयीतरित्या आढळून आले. एका नागरिकास एक बॉक्स देऊन त्याच्याकडून ८० हजार ४० रूपये घेऊन पुन्हा बसस्थानकाकडे आले. ही बाब रिक्षाचालकास संशयरस्पद वाटल्याने त्याने सदरील माहिती पोलिसांना कळविली. माहिती मिळताच क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. बी. काळे आणि त्याच्या पथकाने तत्काळ धाव घेत दोघांनाही अटक केली. त्यांच्या ताब्यातून ८० हजार ४०० रूपये रोखसह पाच मोबाईल जप्त करण्यात आली. पुढील तपासासाठी दोघेही आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले. दोघांची कसून चौकशी सुरू असून त्यांनी नेमके कशाचे आणि कोणाला बॉक्स दिले. त्याबदल्यात ८० हजार रूपये कोणी दिले, याची तपासणी करण्यात येत आहे. भारतात वास्तव्यासाठी व प्रवासासाठी आवश्यक असणारे पासपोर्ट व ट्रॅव्हqलग कागदपत्र (व्हिसा) व अन्य स्वतःची ओळख पटावी असे कागदपत्र नसल्यामुळे दोघांविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सातोनकर करीत आहेत.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.