प्रतिनिधी
औरंगाबाद : महापाकिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात गेल्या दहा दिवसापासून मृत्यूशी झुंज देणाèया पांढरी वाघीण भानुप्रियाचा आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. वन विभागाच्या पथकाच्या नियंत्रणाखाली भानुप्रिया या वाघाणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

१९९५ साली ओरिसा (भुवनेश्वर) येथील नंदनकानन या प्राणी संग्रहालयातून येथे आणण्यात आलेल्या पांढèया वाघणीला भानुप्रिया हे नाव देण्यात आले होते. वयाच्या तीन वर्षापासून ती शहरातील सिध्दार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात होती. या वाघीनीसोबत प्रमोद या पांढèया वाघालाही आणण्यात आले होते. भानुप्रियाने दोन वेळा पिल्लांना जन्म दिला. त्यात दोन नर व दोन मादी असा समावेश होता. यातील एक जोडी संजय गांधी नॅशनल पार्क येथे पाठविण्यात आली. दरम्यान २० वर्षापासून सिद्धार्थ उद्यानात येणाèयांचे मनोरंजन करणाèया भानुप्रियाची अचानक ९ नोव्हेबर रोजी वार्धक्यामुळे प्रकृती खालावली होती. तिला सलाईनवर ठेवण्यात आले होते. प्राणी संग्रहालयाचे प्रमुख डॉ.बी.एस.नाईकवाडे व त्यांच्या पथकाने विविध उपचार करुन शर्तीने प्रयत्न केले. दरम्यान, आज पहाटे उपचार सुरु असतानाच भानुप्रियाचा मृत्यू झाला. वन विभागाच्या अधिकाèयांच्या देखरेखीखाली व महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी, विरोधी पक्ष नेते डॉ. ज‘र खान, उपायुक्त निकम यांच्या उपस्थितीत भानुप्रियाचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.