प्रतिनिधी
औरंगाबाद : लक्ष्मीपूजन करत असतानाच क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली. शेंद्रा एमआयडीसीत ही घटना घडली.
सूत्रांनी सांगितले, की रंजित यादवराव खरात (रा. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) व त्याची पत्नी कांचन (२८) हे शेंद्रा एमआयडीसीतील संतोष फेब्रिकेशन परिसरात राहत होते. रंजित रोज दारू पितो. दिवाळीतही तो दारू पिऊनच होता. लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्याने पत्नी कांचनला मारहाण केली. त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. शेजारील नागरिकांनी ही माहिती करमाड पोलिसांना दिल्यानंतर पोलिस तातडीने त्याच्या घराकडे आले आणि त्यांनी विवाहितेला घाटीत दाखल केले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पोलिसांनी रंजित खरातला अटक केली केली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अंबादास धाडवे करत आहेत.