प्रतिनिधी
औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वीच दिप्ती या वाघीनीने एका पिलास जन्म दिल्याने सिद्धार्थ उद्यानात आनंदाचे वातावरण असतानाच आज सकाळी त्या पिलाचा मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात भानुप्रिया या पांढèया वाघीणीचा मृत्यू झाल्यानंतर एका महिन्याच्या आतच दिप्ती या वाघीनीने सोमवारी पहाटे एका बछड्यास जन्म दिला. यामुळे उद्यानात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच या पिलास पाहण्यासाठीही लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. ज्या वाघांची संख्या कमी होत आहे. त्या वाघांच्या कुटूंबात दिप्ती या वाघीणीने पिलाला जन्म दिल्यामुळे एका नव्या वाघाचा समावेश झाला होता. मात्र पिलाला जन्म दिल्यापासून वाघीण दिप्ती अस्वस्थ होती. तिने पिलाला जन्म दिल्यानंतर ज्या गोष्टी करणे गरजेच्या होत्या त्या करत असतानाच त्यास वाघिणीने विरोध दाखविला होता.
या संदर्भात डॉ.बी.एस.नाईकवाडे म्हणाले की, हे पिल्लू जन्मताच कमजोर होते. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची संपूर्ण तांत्रिक तपासणी करण्यासाठी पशू वैद्यकीय विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टर प्रक्रिया करत आहेत. शवविच्छेदन अहवालात सर्व काही स्पष्ट होईल.