Home » , , » भारतनगरात पोलिसांचा गोळीबार

भारतनगरात पोलिसांचा गोळीबार

Written By Aurangabadlive on शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१२ | १०:२३ AM

प्रतिनिधी
औरंगाबाद : जागा मालकाने होर्डिंग काढायला सांगितले म्हणून एका नेत्याने गारखेडा परिसरातील भारतनगरात रात्री चांगलाच गोंधळ घातला. वाद वाढल्याने पोलिसांना बोलाविण्यात आले. पण यावेळी पोलिसांवर दगडफेक झाल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. यात एक पोलीस कर्मचारी डोक्याला दगड लागून गंभीर जखमी झाला.
भवानी चौकात भगवा झेंडा लावलेला आहे. त्याला लागूनच रावसाहेब कासारे यांच्या मालकीचा मोकळा आहे. या प्लॉटवर मुक्तार पटेल मित्रमंडळाचे शुभेच्छा होर्डिंग लावलेले होते. रात्री काही नागरिकांनी व प्लॉट मालक कासारे यांनी मुक्तार पटेल मित्रमंडळाच्या एका सदस्याला बरेच दिवस झाले आता तरी होर्डिंग काढा म्हणून विनंती केली.त्यावरून त्या सदस्याने कासारे व इतरांशी वाद घातला व लगेचच मुक्तार पटेल यास फोन करून बोलावून घेतले. मुक्तार लगेचच टाटा सफारी कारमध्ये तेथे आला. तो आल्याबरोबर त्याचे २०० ते ३०० कार्यकर्तेही जमा झाले. येथे मुक्तार पटेलने नागरिकांना शिविगाळ करायला सुरुवात केली. त्यामुळे डॉ. पैठणे यांनी फोनवरून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मुक्तार पटेल यांना तेथून जायला सांगितले. तरीही  मुक्तार पटेल हलत नसल्याचे पाहून पोलिसांनी त्याला जायला सांगितले. त्यामुळे जमावातील कुणीतरी पोलिसांवर दगडफेक केली. यात पोलिस कर्मचारी गदई यांच्या डोक्याला दगड लागून ते गंभीर जखमी झाले. नंतर मात्र जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. नंतर मुक्तार पटेल कार सोडून पळाला. जमावही क्षणात गायब झाला. आता पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या घटनेत बीट मार्शल विजयसिंग बमनावत, विष्णू लिपणे यांच्याही पायास दगड लागून ते जखमी झाले. सुधाकर गदई यांना कमलनयन बजाज रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलिस आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, विजय पवार, पोलिस निरीक्षक राजकुमार डोंगरे यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन केले.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.