Home » » तरुणींमध्ये स्टाइलिस्ट साड्यांचं वेड

तरुणींमध्ये स्टाइलिस्ट साड्यांचं वेड

Written By Aurangabadlive on गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१२ | १२:०२ PM

सेलिब्रिटींमध्ये असलेलं साड्यांचं वेड तरुणींमध्ये पसरलं नाही तरच नवल. यंदा थंडीतल्या फॅशनमध्ये साड्याही इन आहेत. या ट्रेण्डसाठी कुठले रंग, प्रकार खरेदी कराल याच्या काही टिप्स देत आहेत फॅशन डिझायनर आणि मेकओव्हरच्या कॉलमिस्ट अर्चना कोचर. कुठल्याही सेलिब्रिटींचा इंटरव्ह्यू वाचा. सगळ्यांना साडी आवडत असल्याचं वाचायला मिळतच. हीच स्टाइल सगळीकडे पसरली नाही तरच नवल. यामुळेच सध्या लग्न असो किंवा पार्टी, तरुणींची साड्यांनाच पसंती मिळतेय. यामुळे कॉलेज किंवा ऑफिससाठी कॅज्युअल्स घालणाèया तरुणीच्या वॉर्डरोबमध्ये एखाद-दुसरी साडी तरी असतेच. नेटच्या साडीवर केलेलं स्टोन वर्क, लेहंगा साडी, बनारसी साडी यांची सध्या चलती आहे. या साड्या विंटर साड्या म्हणूनही ओळखल्या जातात. प्रिंट्स आणि एम्ब्रॉयडरीज यांच्यामुळे या सीझनला खुलून दिसणाèया साड्यांना तरुणींची पसंती आहे. लेहंगा साडी आणि कलर ब्लॉक साडी हे २०१२ मधले साड्यांचे आणखी काही टड्ढेंड्स आहेत. क्रिस्टल्स, स्टोन्स यांच्यासह हिंदी आद्याक्षरांनी सजवलेल्या साड्या मुलींमध्ये खूप फेमस आहेत. प्रिंटेड साड्या हा ऑफिसगोअर्स मुलींसाठी चांगला पर्याय आहे. त्यांच्या डार्क रंगांमुळे ते पार्टी वेअर, फेस्टिव्हल्स येथेही नेसू शकता. फ्लोरल प्रिंट तर कुठल्याही वयोगटासाठी उत्तमच. एखाद्या समारंभात फेमिनाइन लूक मिळवून देण्यासाठी या साड्यांना पर्याय नाही. साडी खरेदी करताना काय कराल : शिफॉन, जॉजेर्ट अशा मटेरिअलच्या साड्या निवडा. त्या वजनाला हलक्या आणि नेहमीच चांगल्या दिसतात. साडी खरेदी करताना चमकदार आणि आनंददायी रंग निवडा. निळा रंग हा बहुतांश महिलांचा आवडता रंग असतो. बारीक एम्ब्रॉयडरी असलेली साडी अधिक खुलून दिसते. साडीवर भारंभार दागिने घालू नका. साजेसे दिसतील असे मोजकेच दागिने वापरा. कुठल्याही वयोगटातील स्त्री साडीत सुंदरच दिसते. राखाडी, काळा, तपकिरी, केशरी, हिरवा, मोतीया रंग आणि फिशी रेड अशा रंगांनी लूकमध्ये फरक पडतोच.

Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.