Home » , , » बायको सोडून, सालीला पळवले!

बायको सोडून, सालीला पळवले!

Written By Aurangabadlive on गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१२ | १०:१० AM

प्रतिनिधी
औरंगाबाद : कन्नड तालुक्यात घडलेला एक किस्सा सध्या जिल्ह्यात चवीने चर्चिला जात आहे. झाले असे की पतीने बाळंतपणासाठी बायकोला माहेरी सोडले आणि सालीला घेऊन पोबारा केला. हा वेगळा पायंडा पाडणारा जावई काही केल्या ऐकत नसल्याचे पाहून सासूने पोलिसांकडे तक्रार केली आहे.
कन्नडच्या शनिमंदिर भागात ही घटना घडली. संतोष सोमनाथअप्पा डब्बे (रा. चांदोरी, जि. नाशिक) याने पत्नीला बाळंतपणासाठी कन्नडला आणून सोडले. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पत्नीची लहान बहीण सोळा वर्षीय मुलीला पिशोर नाक्याजवळील व्यंकटेश ज्वेलर्स दुकानाजवळून पळवून नेले. पालकाच्या संमतीशिवाय लग्न करण्यासाठी जावयाने पळवून नेल्याची तक्रार पीडित सासूने कन्नड पोलिस ठाण्यात दिली.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.