प्रतिनिधी
औरंगाबाद : ५८ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दहा लाख रुपये रोख चोरीच्या घटनेचा अद्याप तपास लागलेला नसतानाच पुन्हा चोरट्यांनी गावाकडे गेलेल्या व्यावसायिकाचे घर फोडून साडेतीन किलो चांदीचे दागिने व रोख २५ हजार रुपये चोरून नेले. ही घटना सिडको एन ३ येथे घडली.
१० नोव्हेंबर रोजी सिडको एन ३ येथे राहणारे व्यापारी मुरली टोपणदास राणी यांचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून ५८ तोळे सोने व १० लाख रुपये रोख लांबविले होते. त्याच दिवशी निवृत्त बँक अधिकारी अनंत सदाशिव पुराणिक यांनी दिवाळी पूजनासाठी बँकेच्या लॉकरमधून काढलेले ३४ तोळे सोन्या चांदीचे नाणी मोटारसायकलवर आलेल्या चौघा जणांनी ते कारमध्ये पेटड्ढोल भरत असताना मागच्या सीटवरून चोरून नेले होते. या चोरीचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेरात टिपले आहेत. मात्र अद्यापपर्यंत या दोन्ही चोèयांचा तपास लागलेला नाही. त्यानंतर आता सिडको एन ३ भागातील प्लॉट नं ३८ येथे राहणारे मनीष जितेंद्रसिंग बुनलिया हे मित्तल ऑप्टीकल्स या निराला बाजारातील दुकानाचे मालक हे कुटुंब १७ नोव्हेबर रोजी कोकणात गेलेले आहेत. त्यांच्या बंगल्यातील झाडांना पाणी टाकणारा विलास मोरे सकाळी आला असता गेल्या दोन-तीन दिवसांपासूनची वर्तमानपत्रे बाहेर पडलेली दिसली. त्यामुळे मोरे यांनी वर्तमानपत्रे उचलून ती मुख्य दरवाज्यातून आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा उघडलेला दिसला. मोरे यांनी ताबडतोब ही बाब मनीष याचे नातेवाईक शालीन बुनलिया यांना फोन करून सांगितली. त्यानंतर याप्रकरणी शालीन यांनी मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात चोरी संबंधी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता चोरट्यांनी बंगल्याचे मुख्यद्वार तोडून घरातील खालच्या मजल्यावर असलेल्या चार खोल्या उचकटून साडेतीन किलो चांदीची भांडी व दागिने असे २५ हजार रुपये रोख चोरून नेल्याचे आढळून आले.