प्रतिनिधी
औरंगाबाद : अॅड. प्रवीण कंधारकर व शिवानी कंधारकर या काका-पुतणीने १९४० ते ६० पर्यंतची एकापेक्षा एक सरस गाणी औरंगाबादकरांना ऐकवून मंत्रमुग्ध केले. निरंजन योग - निसर्गाेपचार संशोधन केंद्र व योगथेरपी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भानुदास चव्हाण सभागृहात त्यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
वाद्यावर देहाडे व संचाने त्यांना साथ दिली. शिवानी सध्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकते. एवढ्या लहान वयात गायकीवर मिळविलेले प्रभुत्व अफलातून होते. उपमहापौर संजय जोशी, स्वाती जोशी व सी. बी. रोजेकर यांनी मैफलीचे उद््घाटन केले. यावेळी डॉ. अविनाश देशमुख, विजया रोजेकर, संजय लताड, अतुल लताड, सुनील किर्दक, पराग पांडे, विनीता पांडे, दत्तात्रय रोजेकर, नितीन कंधारकर, डॉ. ज्योती दाशरथी, वर्षा कंधारकर, प्रसाद साडेकर, संहिता पाठक, किशोर नागरे, अंबादास दानवे, के. बी. गवळी, भगवान राऊत, पोहनेरकर, प्रवीण जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. चारुलता रोजेकर-देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मृणालिनी फुलगीरकर यांनी आभार मानले. शिवानीची आई व वडील नितीन कंधारकर यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.