प्रतिनिधी
औरंगाबाद : श्री साईबाबा बहुउद्देशीय सेवा मंडळ, एन-११, साई मैदान, दीपनगर, हडकोतर्फे २१ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकी एकादशीनिमित्त औरंगाबाद ते शिर्डी पायी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हे अंतर ११२ कि.मी.चे आहे.
२१ नोव्हेंबर रोजी सकाळी या पालखी सोहळ्याला प्रारंभ होईल. सायंकाळी सातला पोळरांजणगाव येथे हभप जयश्रीताई पाटील यांचे कीर्तन होईल. दुसèया दिवशी २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातला शिवराई येथे भजनसंध्या होईल. २३ नोव्हेंबरला सायंकाळी सातला वारी कान्हेगाव येथे हभप विकास महाराज गायकवाड यांचे कीर्तन होईल. २४ नोव्हेंबर रोजी पालखी शिर्डीत पोहचेल. या पालखीत सहभागी होण्यासाठी भाविकांना श्री साईकृपा किराणा स्टोअर्स, टीव्ही सेंटर मैदानासमोर, श्री गणेश डेली नीडस दक्षिणमुखी हनुमान मंदिर, हडको, एन-११ बी, श्री गजानन सोनार, सुरेवाडी, अजय गिरी, शालिक जैस्वाल यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.