प्रतिनिधी
औरंगाबाद : शारदाश्रम कॉलनीतील लॉटरीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ४ लाख ४७ हजार रुपयांचा जॅकपॉट स्वतःच प्राप्त करून घेतला आहे. चोरट्यांची दिवाळी गेल्या काही दिवसांत चांगलीच धुमधडाक्यात साजरी होत असल्याचे दिसत असून, शहरातील ही याच आठवड्यातील पाचवी मोठी घटना आहे.
रोजच चोèया घडत असल्याने नागरिक घाबरून गेले आहेत. पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन पोलिसांना अलर्ट केले तसेच गस्तीमध्येही वाढ केली आहे. शारदाश्रम कॉलनीतील राज एजन्सीच्या संरक्षक भिंतीवर चढून तीन अनोळखी चोरटे आतमध्ये गेले. सुरक्षा कर्मचारी प्रल्हाद सोनेराव म्हस्के (६४, भीमनगर, भावसिंगपुरा) यांनी त्यांना हटकले. त्यामुळे चोरट्यांनी म्हस्के यांच्या पोटाला चाकू लावून आवाज केलास तर मारून टाकू, अशी धमकी दिली. नंतर चोरट्यांनी सुरक्षा कर्मचाèयाला बांधून टाकले. लोखंडी टॉमीने तिजोरीचा दरवाजा तोडून रोख ४ लाख ४७ हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पळ काढला. सुरक्षा कर्मचाèयाला बांधून ठेवल्याचे सकाळी काही जणांनी पाहिले.त्यांनीच सुरक्षा रक्षकाला सोडवले. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे