डोकेदुखी, सांधेदुखी, शरीराच्या कोणत्याही भागात वेदना सुरू झाल्या की आपल्याला पेनकिलर गोळीची गरज भासते. पण आता पेनकिलर सोडा आणि शास्त्रज्ञांनी सांगितलेला मार्ग अवलंबा. शास्त्रज्ञांनी सांगितलेय की पेनकिलर घेण्यापेक्षा दहा मिनिटे स्वतःची समाधी लावा. वेदना झटपट नाहिशा होतील! नॉर्थ केरोलिना येथील स्कूल ऑफ मेडिसीनच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले. संशोधनामुळे आता पेनकिलरसारख्या वेदनाशामक गोळ्याची गरज शरीराला भासणार नाही, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. हे संशोधन १५ विद्याथ्र्यांवर करण्यात आले. ज्या विद्याथ्र्यांना डोकेदुखी आणि तणावाची समस्या भेडसावत होती. त्यांना ध्यान धरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांची डोकेदुखी तातडीने कमी झाली. या विद्याथ्र्यांना कोणत्याही गोळ्या घेऊ दिल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे लोकांनी औषधी घेतल्यापेक्षा ध्यान लावण्याचा अभ्यास करावा, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला.