प्रतिनिधी
औरंगाबाद : बन्सीलालनगर येथे आठ दिवसांपूर्वी मंगळसूत्र चोरीची घटना घडली होती. गुरूच्या दर्शनासाठी चाललेल्या विवाहितेचे ७५ हजार रुपयांचे गंठण चोरट्याने हिसकावून पळ काढला होता. हा चोर क्रांतीचौक पोलिसांनी पकडला. त्याच्याकडून गंठण जप्त केलडे आहे.
कपिल ऊर्फ कल्लू अशोक शर्मा (२०, रा. चिखली, जि. बुलडाणा) असे चोरट्याचे नाव आहे. त्याचा साथीदार फरार आहे. कल्लूने चोरलेले २५ ग्रॅमचे गंठण पोलिसांना काढून दिले. रमादेवी कृष्णा मोपुरू (४३, रा. प्राईड टॉवर्स, वेदांतनगर) या बन्सीलालनगर येथील पुंडलिक काका या आपल्या गुरूच्या दर्शनासाठी ११ नोव्हेंबर रोजी आल्या होत्या. तेव्हा ही चोरी झाली होती. या प्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक उन्मेष थिटे यांनी चोरट्यांचा कसून शोध घेतला. त्यांना फिर्यादी व प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या चोरट्याच्या वर्णनानुसार चिखली येथे जाऊन कल्लू शर्मा यास जेरबंद केले.