कर्म करण्याचा ,तुला अधिकार । कर्म फलावर ,इच्छा नको।।
निषिध्द ते कर्म करू नको कधी । कर्तेपण आधी, टाकी टाकी।।
निष्काम बुध्दीने ,स्वकर्म करून । करी ते अर्पण ,ईश्वराला।।
शुकदास म्हणे,होऊन सक्रिये। अलिप्तची राहे ,साक्षीरूपे।।
-प.पू.स्वामी शुकदास महाराजश्री,अध्यक्ष /संस्थापक विवेकानंद आश्रम
जीव जन्माला आला की,त्यासोबत कर्म ही आलीच. कर्माशिवाय जीवन ही संभवना शक्य नाही .'कर्माशिवाय मनुष्य जगूच शकत नाही. आपण जर सारे कर्मशून्य होऊ, तर समाज चालेल कसा? कर्म करण्याचे बंधन प्रत्येक व्यक्तीला आहे.किंबहुना तो त्याचा निर्सगदत्त अधिकराच आहे. मग व्यक्तीला कर्मामुळेच लहानपण,थोरपण प्राप्त होत असते. हया अभंगातून महाराजश्री कर्माची महती कमी शब्दात अत्यंत प्रभावीपण सांगतात. अपेक्षा न ठेवता कर्म करणे आवश्यक असते.निष्काम बुध्दी केलेले कर्म केव्हांही सर्वश्रेष्ठच आहे.जसा आरसा मळाने अस्वच्छ होतो, तसे मन अयोग्य कर्माने मलिन होते. मनुष्याने कर्म करतांना निषिध्द कर्म करू नये.ज्या कर्मामुळे आपल्या कमीपणा येईल इतरांना त्याचा त्रास ,दुःख होईल असे कर्माचा मनुष्याने त्याग करावा.कर्म ही सात्विक असावी.कर्म करतांना कर्त्याचा अहंकार नष्ट व्हावा. मनुष्याने कर्म करतांना कर्तेपणाचा त्याग करावा.आपले कर्म हे निष्काम बुध्दीने करून ती कर्म जणू ईश्वर कर्म आहे हया भावने करून ती ईश्वर चरणी अर्पण करावी. महाराजश्री प्रस्तुत अभंगातुन मनुष्याला अत्यंत मौलिक संदेश देतात. मनुष्याने कर्म करतांना आपला साक्षीभाव जागृत ठेवून कर्म करावी म्हणजे आपल्यातील कर्तेपणाचा आपोआप लय होईल.
-संतोषबापू थोरहाते, विवेकानंद नगर, मो.9923209658