प्रतिनिधी
औरंगाबाद : दुचाकी चोरून त्या अन्य लोकांना कमी qकमतीत विकणारा चोरटा अलगद पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चार दुचाकी जप्त केल्या आहेत. क्रांतीचौक पोलिसांनी ही कामगिरी केली.
गारखेड्यातील माणिक हॉस्पिटलमधून शेख हुसेन दादामियाँ (रा. गारखेडा) यांची हिरोहोंडा मोटारसायकल सय्यद बब्बू सय्यद बशीर याने पळविली होती. सय्यद बब्बू हा ही दुचाकी विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती क्रांतीचौक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रकाश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक थिटे यांनी कर्मचारींना सोबत घेऊन जाफरगेट येथे सापळा रचला. तेव्हा बब्बू हा चोरीच्या दुचाकीवर जाफरगेटजवळ आला. त्यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप घालून त्याला पकडले. त्याच्याकडे मोटारसायकलबाबत विचारणा केली असता त्याने ती मोटारसायकल माणिक हॉस्पिटलमधून चोरल्याची कबुली दिली. बब्बूने आणखी तीन मोटारसायकली चोरल्याचे मान्य करून त्या मोटारसायकली घरातून पोलिसांना काढून दिल्या. यामध्ये विजयसिंग कौतिकराव जाधव (४२, रा. कासलीवाल विश्व, उल्कानगरी) यांची हिरोहोंडा पॅशन मोटारसायकल, बिगर क्रमांकाच्या ज्यांचा चेसिस क्रमांक ०७ एम ०२ एफ १६५७९ व ०६ डी १६ सी २०२९६ असा आहे, अशा दोन हिरोहोंडा मोटारसायकलींचा समावेश आहे.