रेनॉल्डने गंडविल्याचे प्रकरण; तक्रारकर्ताच आरोपी निघाला
औरंगाबाद : वाळूज एमआयडीसीसह औरंगाबाद शहरातील अनेकांना गंडा घालणाèया रेनॉल्ड फंड मॅनेजमेंटचे सूत्रधार सापडतील, अशी आशा पोलिसांच्या नव्या कारवाईमुळे व्यक्त होऊ लागली आहे. फसवणूक झाल्याचे नाटक करणाराच आरोपी निघाल्याने पोलिसही हैराण झाले आहेत.
गेल्या वर्षी रेनॉल्ड कंपनीने अनेकांना हात दाखवला होता, त्याआधी तीन-चार वर्षे कंपनीची वसुली बिनधास्त सुरू होती. नितीन बत्रा (रा. बजरंग चौक) याने बाबासाहेब उर्फ सागर सुखदेव जाधव (रा. जिजामातानगर, पुंडलिकनगर) याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिली होती. रेनॉल्ड फंड मॅनेजमेंटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५० हजार घेऊन नंतर कंपनी बंद पडल्याचे सांगून फसवणूक केली, अशी नितीन बत्राची तक्रार होती. या प्रकरणाचा गुन्हे शाखेने खोलवर तपास केला. त्यातून बत्राही त्याच माळेतला मनी असल्याचे समोर आले. बत्राला ताब्यात घेतल्यानंतर तरी अन्य आरोपींचा ठावठिकाणा लागेल, अशी आशा व्यक्त होत आहे. विवेक नवाथे, उमेश तांबट, विशाल साळवे, संदीप बंड, विनय नाईक, हितेश ठक्कर यांच्याविरुद्ध या प्रकरणात गुन्हा दाखल आहे.