स्नेहा पारवार
औरंगाबाद : जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे दुसरे जिल्हा मराठा साहित्य संमेलन २२ व २३ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील वैजापूर येथे आयोजित केले आहे. त्यानिमित्ताने परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय गवळी यांनी औरंगाबाद न्यूज लाइव्हला संमेलनाविषयी दिलेली माहिती...
यंदाच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भाऊसाहेब पाटील चिकटगावकर राहणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती पद्माकरराव मुळे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी यशवंतराव गडाख राहणार आहेत. संमेलनाच्या दोन्ही दिवशी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात पहिल्या दिवशी साहित्य दिंडी, उद्घाटन व कवी संमेलन होणार आहे. दुसèया दिवशी स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, तीन परिसंवाद, समारोपिय सत्र आणि रात्री परिवर्तनवादी कीर्तन होणार आहे. या वेळी जिल्ह्यातील साहित्यिकांना क्षात्रवीर राजे संभाजी उदयोन्मुख साहित्य पुरस्कार, जगद्गुरू तुकोबाराय जीवन गौरव पुरस्कार व डॉ. सरोजिनी बाबर साहित्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
परिषदेचे संमेलन घेण्याचे हे तिसरे वर्ष. यापूर्वी २०१० साली पहिले जिल्हा मराठा साहित्य संमेलन घेतले होते. त्याचे उद्घाटन त्या वेळी मधुकरराव मुळे यांनी केले होते. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे अध्यक्षस्थानी होते. २०११ मध्ये अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन घेण्यात आले होते. त्याचे उद्घाटन माजी न्यायूमूर्ती बी. एन. देशमुख यांनी केले होते.
यंदाच्या संमेलनाला जास्तीत जास्त साहित्यिक, साहित्यप्रेमी उपस्थित राहतील आणि संमेलन मोठ्या प्रमाणावर यशस्वी होईल, अशी अपेक्षा विजय गवळी यांनी या वेळी व्यक्त केली.