प्रतिनिधी
औरंगाबाद : अनेक दिवसांपासून वादाचा विषय ठरलेला क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्त्याचे नामकरण अखेर पार पडले आणि डॉ. पुरुषोत्तम मार्ग असे नाव देण्यावर गोंधळात का होईना शिक्कामोर्तब झाले. मनपाच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी प्रस्ताव मंजूर करवून घेतला.
सभागृह नेते राजू वैद्य, समीर राजूरकर यांनी रस्त्याला आयुक्तांचे नाव देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. तसा प्रस्ताव सभापती विकास जैन यांनी सूचविला. राजू वैद्य, विरोधी पक्षनेते डॉ.जफर खान, काशीनाथ कोकाटे, समीर राजूरकर, राज वानखेडे, त्र्यंबक तुपे, सुरेश इंगळे यांनी अनुमोदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस, माक्र्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भाजपाच्या विरोधाला न जुमानता पुरुषोत्तम मार्ग मंजूर झाला.