विरोधक हैराण... नक्की पैसे गेले कुठे?
प्रतिनिधी
औरंगाबाद : रस्त्याचे पॅचवर्क करताना कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे पालिकेच्या सत्ताधाèयांनी सांगितले, पण ते काही विरोधकांच्या पचणी पडले नाही आणि मग मनपाच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यावरून गोंधळ सुरू झाला. शेवटी थातूर मातूर उत्तर देऊन शहर अभियंत्यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
पैसे कुठे आणि कोणत्या रस्त्यावर खर्च झाले, असा प्रश्न विरोधकांनी विचारला. मागणी करूनही आमच्या वॉर्डात रस्त्याची दुरुस्ती होत नाही आणि दुसरीकडे कोटी कोटी उड्डाणे आधीच झाल्याचे कळल्याने विरोधक चांगलेच संतापले होते. एवढ्या रकमेवर भ्रष्टाचाराचे पॅचवर्क केला का, असा संतप्त सवाल मीर हिदायतुल्ला आणि अफसर खान यांनी केला. गणेशोत्सव काळात शहराच्या भागात रस्त्यांच्या पॅचवर्कची कामे झाली आणि त्यावर तब्बल सव्वा तीन कोटी रुपये खर्च झाल्याचे सर्वसाधारण सभेत सांगण्यात आले. सभेच्या प्रारंभीच नगरसेवक मीर हिदायतुल्ला यांनी यावर आक्षेप घेतला. किराडपुरा, शहागंजच्या रस्त्यांची अवस्था बिकट आहे. रस्त्यांची कामे अनेक ठिकाणी रखडली असताना दुसरीकडे नुसत्या पॅचवर्कवर कोट्यवधी कसे केले, असा प्रश्न त्यांनी केला. अफसर खान, मिलिंद दाभाडे, जफर खान, राजू शिंदे, अमित भुईगळ, रेखा जैस्वाल या नगरसेवकांनीही हा मुदद्दघा रेटला. विरोधी पक्षाचे सर्वच नगरसेवक आक्रमक झाले. अखेर शहर अभियंता एम. डी. सोनवणे यांनी नव्याने आढावा घेऊन गरजेप्रमाणे दुरुस्तीची कामे केली जातील, असे आश्वासन दिले.