औरंगाबाद : सर्व मिळून ८२ प्रवाशांना घेऊन निघालेली डेक्कन ओडिसी ही खास रेल्वे गुरुवारी औरंगाबादच्या रेल्वे स्थानकावर आली होती. थॉमस कुक या प्रसिद्ध टड्ढॅव्हल कंपनीचे प्रवासी डेक्कन ओडिसी मुंबईहून निघाली आणि पुढे दिल्लीला जाणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या रेल्वेचा कारभार पाहत असते. डेक्कन ओडिसीच्या मार्गात जितकेही पर्यटन स्थळे येतील ती सर्व पाहून ती पुढे पुढे जात असते. एकूण सात दिवसांचा रेल्वे प्रवास असतो. रेल्वे इतकी अलिशान असते, की स्पा, बार रेस्टॉरंट अन् स्टीम बाथ, कॉफी शॉप सर्व काही त्यात असते. इंटरनेट सेवा आणि टीव्ही असल्याने बाहेरच्या जगाशी त्यांचा कायम संपर्क असतो. मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसहून १७ ऑक्टोबरला दुपारी पावणे चारला रेल्वे निघाली होती. गुरुवारी सकाळी औरंगाबादला आली. रेल्वेतील प्रवाशांना औरंगाबादची पर्यटनस्थळे दौलताबाद, खुलताबाद, घृष्णेश्वर, वेरुळ दाखवून नंतर पुन्हा रेल्वे मार्गी लागेल. दिल्लीला २४ ऑक्टोबरला सकाळी आठला डेक्कन ओडिसी पोहचेल, असे सूत्रांनी सांगितले.