नारेगावात रस्ता रोको, ट्रकच्या लागल्या रांगा!
प्रतिनिधी
औरंगाबाद : नारेगावातून जाणारा जयभवानी चौक ते कचरा डेपो रस्ता आठ महिन्यांपासून खोदून ठेवला आहे. मात्र रस्त्याचे काम होताना काही दिसत नाही. या रस्त्यावर सातत्याने अपघातांची मालिका सुरू आहे. तरीही मनपा प्रशासन याकडे गांभीर्याने पाहून रस्त्याचे काम पूर्ण करत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नारेगावकरांनी कचरा डेपोकडे जाणारे सर्व ट्रक अडविण्यास सुरुवात केली. गुरुवारी सकाळपासून सुरू झालेले रात्र उलटून चालली तरी सुरूच होते. यामुळे ट्रकची भलीमोठी रांग लागली होती.
नगरसेवक मनीष दहीहंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने जमून ट्रक अडविण्यास सुरुवात केली. आंदोलनाची माहिती जेव्हा मनपाचे उपअभियंता के. आर. कुलकर्णी यांना कळली, तेव्हा ते तातडीने आंदोलनस्थळी आले. त्यांनी रस्त्याचे काम लवकर सुरू करण्याची ग्वाहीही दिली, पण प्रत्यक्ष काम सुरू करा, असा हट्ट नागरिकांनी धरला. त्यामुळे ते आल्या पावली परतले. नंतर शहर अभियंता एम. डी. सोनवणे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलकांनी काही माघार घेतली नाही.