घातपाताची शक्यता नाही, पेट्रोलपंपावर पेट्रोल उतरवत असताना अचानक भडका
विजय कमळे
औरंगाबाद : टँकरमधून पेट्रोल उतरवत असताना नळीला अचानक आग लागून भडका उडाला आणि त्यानंतर झालेल्या स्फोटात एका सफारी कारसह पाच दुचाकी खाक झाल्या. जुना मोंढा परिसरातील भारतीय पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपावर ही घटना घडली. वेळीच अग्निशमन विभागाच्या चार गाड्या आल्याने मोठा धोका टळला. अन्यथा मोठी जिवीत हानी होऊ शकली असती. सध्या घटनास्थळी पोलिसांचा ताफा आहे आणि वरिष्ठ अधिकारीही पोहचले आहेत. या मागे काही घातपात तर नव्हता, याची चौकशी केली जात आहे. मात्र हा केवळ अपघात असून, घातपाताची शक्यता नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शहरवासियांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
सूत्रांनी सांगितले, की नाशिक येथून एम एच २०, एटी २१ क्रमांकाचा टँकर १२ हजार लीटर पेट्रोल घेऊन जुना मोंढ्यातील जाफर गेटजवळ खलील चौधरी यांच्या पेट्रोल पंपावर आला होता. पेट्रोलचे सॅम्पल काढत असतानाच अचानक आग लागल्याचे सांगण्यात आले. मात्र आगीच कारण अजून समजू शकले नाही. आग लागल्यानंतर लगेचच पेट्रोलपंपावरील कर्मचाèयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला तसेच अग्निशमन विभागालाही तातडीने पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी आल्याने संभाव्य मोठा धोका टळला. मात्र तरीही लागलेल्या आगीत टाटा सफारी (क्र. २०, वाय ९६७१) सह एक स्कूटर व तीन दुचाकी जळून खाक झाल्या. घटनेची माहिती कळताच पोलिस उपायुक्त जय जाधव, सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अर्जून भांड, क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मनपा आयुक्त पुरूषोत्तम भापकर, खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.