ऐकून जरा विचित्रच वाटेल, पण नव्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे, की उजव्या हातांनी काम करणाèयांच्या तुलनेत डाव्या हातांनी काम करणारी मंडळी जास्त भित्री असते. भीतीयुक्त गोष्ट समोर आल्यानंतर त्याविषयी खातरजमा करून न घेताच डावे सुरक्षितस्थळी पळ काढत असतात... एडिनबर्ग येथील क्वीन मार्गेट युनिव्हर्सिटीचे मनोवैज्ञानिक कॅरोलिन चौधरी यांनी संशोधनातून हा निष्कर्ष काढला आहे. त्यांचे हे संशोधन दी टेलिग्राफ या ब्रिटिश वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. त्यात म्हटले आहे, की काही डाव्या लोकांना एका हॉलमध्ये बसवून एक भीतीयुक्त चित्रपट दाखविण्यात आला. चित्रपटातील काही दृश्ये डाव्यांच्या मेंदूवर मोठा परिणाम करून गेली. एखाद्या अपघातानंतर व्यक्तीच्या डोक्यावर जसा परिणाम होतो, तसेच हे झाले होते. याला पोस्ट ट्रॉमेटिक डिसऑर्डर असे म्हटले जाते. याबाबत अधिक माहिती जाणून घेतल्यानंतर भीतीचा मेंदूवर होणारा परिणाम समजणे सोपे जाईल. भीती जाणवण्याचे प्रमाण उजव्यांमध्ये फार कमी असते, असेही या संशोधनातून समोर आले. कारण डाव्यांप्रमाणेच काही उजव्या लोकांनाही हाच चित्रपट दाखविण्यात आला. तेव्हा त्यांच्या मेंदूवर त्याचा फारसा परिणाम झालेला नव्हता. तसेच कुणीही संपूर्ण चित्रपट संपेपर्यंत थिएटरबाहेर गेले नव्हते. डाव्या लोकांनाच जास्त भीती का वाटते, याबाबत अधिक संशोधन सुरू असल्याची माहिती कॅरोलिन यांनी दिली.
Home »
» नव्या संशोधनात दावा; उजव्यांच्या तुलनेत डावे जास्त भित्रे