ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी हृदयावर किडनीच्या साह्याने उपचार करण्याचे अनोखे तंत्र विकसित केले आहे. या तंत्राने हार्ट फेल होण्याच्या भीतीने जगणाèया रूग्णांवर उपचार शक्य होणार आहे. इंपिरियल कॉलेज ऑफ लंडनच्या वैज्ञानिकांनी या तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. या तंत्रात किडनीतून मेंदूला संकेत पोहचवणाèया नसांना सुन्न केले जाते. आतापर्यंत या तंत्राचा प्रयोग उच्च रक्तदाबाच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी केला जायचा. इंपिरियल कॉलेज ऑफ लंडनच्या वैज्ञानिकांची एक टीम हृदयविकाराचे शिकार झालेल्या रूग्णांवर उपचार करताना या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, हृदयविकाराचा थेट संबंध किडनीशी असतो. किडनी शरीर आपात स्थितीत आल्याचा संकेत मेंदूला पाठवते. नंतर हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वेगाने वाढतो. त्यामुळे हृदयावर जोर पडतो आणि श्वास घेण्यास अडचण जाते. त्यानंतर हृदयाचा झटका qकवा हार्ट फेल होण्याची शक्यता निर्माण होते. तंत्रज्ञानात किडनीतून हृदयाला संकेत पाठविणाèया नसांना सुन्न केले जाते. त्यामुळे हार्ट फेल होण्यापासून आणि शरीर आपातस्थितीत असल्याचे संकेत जाण्यापासून रोखले जाते. एवढेच नाही तर शरीरात रक्त आणि पाण्याचा स्तर मापून मेंदूपर्यंत याची सूचना पोहचवली जाते. या तंत्रज्ञानाचा आणखी बराच अभ्यास होणार आहे.
Home »
» हृदयावर किडनीच्या साह्याने उपचार करण्याचे अनोखे तंत्र विकसित