चीनच्या चॉन्गकिंग शहरात राहणाèया हुएंग गुओफो या कलाकाराची जीवनकहानी कुणालाही थक्क करणारी आहे. दोन्ही हात गमावल्यानंतर आयुष्यात सर्व काही संपले आहे, अशी भावना एका क्षणी त्याच्या मनात आली, पण दुसèयाच क्षणी पुन्हा नव्या उमेदीने जगण्याची आशाही निर्माण झाली. मग त्याने हातांची जबाबदारी पायांवर सोपवली आणि आयुष्याचा संघर्ष पुन्हा सुरू झाला... पायांनी आणि त्याच्यातील अंगभूत कलाकौशल्यांनी त्याला इतकी साथ दिली की, आजघडीला तो चीनमधील प्रसिद्ध कलाकार झाला आहे. त्याच्या दिमतीला गाडी आहे, नोकरचाकर आहेत, मोठा अलिशान बंगला आहे आणि विशेष म्हणजे त्याला चांगली जीवनसाथीही मिळाली आहे... आयुष्यात काहीच अशक्य नाही, हेच जणून हुएंगने सर्वांना स्वकर्तृत्वातून सांगितले आहे.
हुएंग आता ४१ वर्षांचा झाला आहे. त्याला लहानपणापासूनच कलाकारीची हौस होती. वयाच्या आठव्या वर्षापासून सुरू झालेली त्याची चित्रकारी बाराव्या वर्षी हात गमावल्याने खंडित झाली होती. मग त्याने पायांनी चित्र साकारणे सुरू केले. पायांच्या दोन बोटांत ब्रश पकडून तो चित्र काढतो. कधी कधी तोंडाचाही वापर करतो. विजेचा तीव्र धक्का बसून झालेल्या अपघातात त्याने दोन्ही हात गमावल्याचे सांगण्यात येते. सुरुवातीला जेव्हा त्याने पायांनी चित्र काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला मोठा त्रास सहन करावा लागला. चित्रही व्यवस्थित येत नव्हते. बदलत्या काळात त्याची चित्रकारी सुधारत गेली. हुएंग १८ वर्षांचा असताना त्याचे वडील आजारी पडले. तेव्हा त्यांच्या उपचारासाठी हुएंगला पैशाची गरज भासली. पैशांसाठी त्याने चीनच्या शहरांचा दौरा सुरू केला. प्रत्येक शहरात रस्त्याच्या बाजूला बसून तो अनोख्या पद्धतीने चित्र साकारू लागला आणि विकू लागला. लोक उत्सुकतेपोटी त्याचे चित्र विकत घेऊ लागले. असाच तो सिचुआन प्रांतातील एका शहरात आला. तेथे त्याची भेट हु गुओइ या तरूणीशी झाली. ती त्याच्या चित्रकारीने इतकी प्रभावित झाली की त्याच्यावर प्रेम करू लागली. हुएंगलाही कुणाचा तरी आधार हवाच होता. मग दोघांनी २००० साली लग्न केले. लग्नानंतर हुएंगचे आयुष्य खèया अर्थाने बदलले. त्याच्या चित्रांची इतकी चर्चा होत गेली की आजघडीला त्याच्या चित्रांना मोठी मागणी आहे. महागड्या qकमतीला त्याची चित्रे विकली जात आहेत. त्यामुळे रस्त्यावर नग्नपावली फिरताना दिसणारा हुएंग आता अलिशान कारमध्ये दिसत आहे. फुटपाथऐवजी अलिशान बेडरूम त्याच्या नशिबी आली आहे आणि हु गुओइसारखी सुंदर बायकोही जीवन फुलवत आहे...

