पेरिस हिल्टनच्या सौंदर्याचे कौतुक करावे तितके कमीच... आजघडीला एक सामाजिक कार्यकर्ती, हॉलीवूड अभिनेत्री म्हणून पेरिस हिल्टनचा नावलौकिक आहे. आज तिच्याकडे सर्व काही आहे धनदौलत, घर, मान-सन्मान... पण तरीही तिला हे आयुष्य भंगलेले स्वप्न वाटते... कारण तिचे स्वप्न काही वेगळेच होते आणि वास्तव काही वेगळेच आहे... वयात आल्यानंतर मुलीला प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. वाईट- चांगल्याचा पदोपदी विचार करावा लागतो. हे केले नाही म्हणून आज पेरिसची qकमत स्वतःच्या नजरेत कवडीचीही नाही. भूतकाळात तिने ज्या चुका केल्या, त्याची खंत तिला अजूनही आहे. पेरिसने जितका नावलौकिक कमावला, त्यापेक्षा कितीतरी अधिक गमावला आहे. त्यामुळे मिळालेला नावलौकिक हा सन्मानजनक नाही, असे तिला वाटते. पेरिसला लहानपणापासून पशू-प्राण्यांप्रती प्रचंड प्रेम आहे. या प्रेमापोटी तिने पशूचिकित्सक होण्याचे स्वप्न पाहणे सुरू केले होते. त्यादृष्टीने तिची वाटचालही सुरू होती. पण ऐन युवावस्थेत तिचं पाऊल घसरलं. रिक सोलोमन नावाच्या युवकावर ती प्रेम करून बसली. रिकच्या गोंडस चेहरा, पिळदार शरीरयष्टीवर पेरिस भाळली. दोघांचे प्रेमसंबंध इतके दृढ झाले की त्यांनी एकमेकांना कधी सोपवले, हे त्यांनाही कळले नाही. २००३ मध्ये पेरिस आणि रिक त्या दिवशी एका हॉटेलच्या रूममध्ये गेले. तिथे पेरिसने रिकला आपले सर्वस्व अर्पण केले. पण रिकच्या मनात काळंबेरं होतं. केवळ प्रेम qकवा हौस म्हणून तो हे करत नव्हता, तर त्यामागे पैसे कमाविण्याची विकृत बुद्धी होती. त्याने पेरिससोबतच्या संबंधाची चित्रफित तयार केली आणि एका वेबसाईटला विकली. दुसèया दिवशी पेरिसची चित्रफित वेबसाईटवर झळकली आणि पेरिसला कुठे तोंड दाखवायलाही जागा राहिली नाही. आपण ज्याला आपले मानले त्यानेच हा छळ केल्याचे तिला पटत नव्हते. त्यानंतर पेरिसच्या आयुष्यात जे घडलं ते कुणाही मुलीसाठी विदारक असंच होतं. पेरिसला नाईलाजाने मॉडेqलग क्षेत्रात यावे लागले. केवळ एका व्हिडिओ टेपने पेरिसच्या आयुष्याचे मातेरे केले होते, पण पेरिस हिम्मतबाज म्हणून तिने स्वतःला सावरले. एका ब्रिटिश वृत्त वाहिनीवरील रिअॅलिटी शोमध्ये पेरिसने भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला आणि अजूनही युवावस्थेत पडलेल्या चुकीच्या पावलाबद्दल खंत व्यक्त केली.