आतापर्यंत मानले जात होते की, संगतीचा परिणाम मानवावर होतो आणि मित्रासोबत राहताना त्याच्या सवयी आपल्यालाही जडतात. पण या मानण्याला शास्त्रीय आधार नव्हता. आता मात्र खुद्द शास्त्रज्ञांनीच त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. संगतीचा परिणाम निश्चितच मानवावर होतो, असे त्यांनी म्हटले आहे. नुसत्या सवयींचीच नक्कल होत नाही तर शरीराचीही नक्कल होते, असा दावा त्यांनी केला आहे. म्हणजे एखादा सडपातळ व्यक्ती लठ्ठ व्यक्तीसोबत राहिला तर तोही लठ्ठ होऊ लागतो! प्रो. निकोलस क्रिस्टाकिस आणि प्रो. जेम्स फोलर यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या पथकाने हे संशोधन केले. त्यासाठी त्यांनी ३२ वर्षांतील आकड्यांचा अभ्यास केला. संशोधनात समोर आले की, लठ्ठ आणि सडपातळ व्यक्तींमध्ये दीर्घकाळ मैत्री राहिली तर काही वर्षांत सडपातळ मित्राच्या वजनात ५७ टक्क्यांनी वाढ होते. मित्राचे वर्तन आणि खाणपाणाप्रती लोक जास्त प्रभावित होतात. याचाच परिणाम म्हणून लठ्ठ लोकांची दिनचर्या आणि खाणपाणाच्या सवयी ते आत्मसात करतात. त्यामुळे कुणाला लठ्ठ व्हायचे असेल तर लठ्ठ व्यक्तीसोबत मैत्री करणे कधीही फायद्याचे ठरेल, असे शास्त्रज्ञ डॉ. क्रिस्टाकिस यांनी म्हटले आहे.
Home »
» शास्त्रज्ञांनीही केले शिक्कामोर्तब संगतीचा होतो परिणाम!