लंडन - कायम बैठे राहिल्यानेलोकांना शारीरिकदृष्ट्या सिगारेट पिणाèयांइतकेच नुकसान सोसावे लागते. सलग दहा वर्षे जे लोक डेस्क जॉब करतात, त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता दुपटीने वाढते, असा धक्कादायक इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. डेस्कवाली मंडळी मग रोज जिममध्ये गेली आणि कसरत केली तर शरीराचे संभाव्य नुकसान टळत नाही, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले. संशोधनात त्यांना दिसून आले की, बसून काम करणारी मंडळी शारीरिकरित्या सक्रीय नसते. त्यामुळे त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता बळावते. शास्त्रज्ञ डॉ. क्लेयर नाइट यांनी सांगितले, की आपण जास्तीत जास्त सक्रीय राहिलो पाहिजेत. संगणकासमोर तासन् तास बसल्याने हृदयासंबंधीचे रोग वाढतात आणि कंबरेचा घेर वाढण्याचीही शक्यता असते, अशी माहिती त्यांनी दिली. क्वीन्सलॅन्ड युनिव्हर्सिटीच्या डॉ. जिनिव हॅले यांनीही या संशोधनात भाग घेतला होता. त्या म्हणाल्या, की डेस्क जॉब करणाèया मंडळींना मध्ये मध्ये एक मिनिटाचा ब्रेक घेणे फायद्याचे ठरू शकते. आजघडीला नोकरदार मंडळींतील बहुतांश मंडळी बैठी जीवनशैली अनुभवतात. कार्यालयात कायम बसून राहावे लागते. अर्थात हे शरीराला आरामदायी वाटत असले तरी त्यामुळे कॅन्सरसारखे आजार बळावतात, असे त्या म्हणाल्या.
Home »
» कायम बसून राहिल्याने कॅन्सरचा धोका जास्त!