महिलांसाठी चिंतेची बाब ठरणारे संशोधन नुकतेच शास्त्रज्ञांनी केले असून, त्यांनी गेल्या चारशे वर्षांतील महिलांच्या चेहèयाचा अभ्यास करून निष्कर्ष काढला आहे, की महिलांचा चेहरा दिवसेंदिवस पुरूषांसारखा दिसू लागला आहे... महिलांच्या चेहèयाची संरचना बदलली गेली आहे. त्यांच्या चेहèयाचा आकार मोठा झाला असून, अनेक महिलांचा चेहरा पाहून तो पुरूषाचा आहे की महिलेचा हा अंदाज लावणेही कठीण जाते. नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीतील एंथ्रोपॉलॉजीचे प्रोफेसर रूज यांनी हे महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे संशोधन केले आहे. त्यांचा संशोधन अहवाल रिसर्च जनरल फोरेन्सिक साइन्स इंटरनॅशनल या प्रसिद्ध मॅगेझिनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे, की महिलांच्या चेहèयांच्या आकार आणि प्रकारात गतीने बदलाव येताना दिसत आहे. गेल्या चारशे वर्षांत हा बदल झपाट्याने झाला असून, आता तर मर्यादेच्याही बाहेर हे प्रमाण गेले आहे. खाणपाणातील बदल आणि अन्य कारणांमुळे हे होत असल्याचे संशोधनात म्हटले आहे. यादृष्टीने अधिक अभ्यास करून महिलांना दिलासा मिळेल, असा उपाय शोधण्याची गरज असल्याचेही प्रो. रूज यांनी म्हटले आहे. गुन्हेगारी प्रकरणांत पूर्वी मृतदेहाच्या ढाचावरून तो महिलेचा आहे की पुरूषाचा हे समजायचे. पण त्यात आता अडचणी येताहेत, असेही ते म्हणाले.
Home »
» महिलांचा चेहरा बनतोय पुरूषांसारखा