आपल्याला तासन् तास इयरफोन कानाला लावून एफएम ऐकण्याची सवय असते. पण ईअरफोनचा वापर करताना युवकांनी सावध राहण्याची गरज आहे. कारण ईअरफोनचा अधिक वापर कायमस्वरूपी बहिरेपण आणू शकतो, असा धोक्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. मोबाईल, एमपीथ्री प्लेअर, म्युझिक सिस्टम, एफएम रेडिओच्या माध्यमातून युवक, युवती तासन् तास गाणी, संगीत ऐकतात. वरचेवर हे फॅड वाढत चालले आहे. पण ही सवय युवकांसाठी घातक ठरत आहे. सध्या बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे इअरफोन उपलब्ध आहेत. परंतु ते चांगल्या प्रकारचे असतीलच याची खात्री नसते. हल्ली चायनामेड ईअरफोन स्वस्तात मिळत आहेत. परंतु ते कानाला व्यवस्थितीत बसत नाही. कानाला ते चांगल्या प्रकारे कव्हर होत नसल्याने त्यातून संगीत चांगल्या प्रकारे ऐकू येत नाही. त्यामुळे आवाज मोठा करुन संगीत ऐकले जाते. विशेषत: प्रवासात, मोबाईलमधून किंवा मॉलमधून युवक ईअरफोनवर गाणी ऐकतात. त्याचा कानावर विपरित होतो. त्यातून सावरण्यासाठी युवकांनी ईअरफोनचा कमीत कमी वापर करण्याची गरज आहे.
Home »
» इयरफोनचा अतिवापर आणू शकतो बहिरेपण
