औरंगाबाद : दिराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेला पंधरा दिवसही पूर्ण झाले नाही, तोच भावजयीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे बहिरगाव शोकसागरात बुडाले. राधाबाई मुरलीधर दापके (३२, रा. बहिरगाव) या महिलेने बहिरगाव शिवारातील शेतजमीन (गट क्र. ११०) मधील पत्र्याच्या शेडमध्ये अँगलला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. किशोर सोनवणे यांनी कन्नड पोलिस ठाण्यात खबर दिली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेचा दीर शिवा विश्वनाथ दापके (२३) याने २७ सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. पंधरा दिवसांत घरात घडलेल्या दोन घटनांमुळे बहिरगावमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.