औरंगाबाद : दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील सात जणांच्या सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीला ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी जेरबंद केल्याची घटना तालुक्यातील भायगाव शिवारात घडली. यातील एक जण फरार झाला आहे.
तालुक्यातील भायगाव येथील शेतकरी भगवान ठोंबरे यांचे काका भायगाव शिवारातील गट क्र.२७७ मधील शेतवस्तीवर राहतात. एक ओम्नी कार (क्र. एम.एच.१५, सी.डी.७६९३) मधून ८ दरोडेखोरांची टोळी ठोंबरे यांच्या वस्तीवर आली. या दरोडेखोरांकडे कुèहाडी, फावडे, टिकाव असे साहित्य होते. वस्तीवर दरोडेखोर आल्याचे समजताच ठोंबरे यांनी सावधगिरीने ग्रामस्थांना व पोलिसांना याची माहिती दिली. प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी या टोळीला घेराव टाकून पकडले; परंतु अंधाराचा फायदा घेत एकाने तेथून पळ काढला. दरम्यान, शेतवस्तीवर सशस्त्र दरोडेखोर आल्याची माहिती मिळताच फौजदार अशोक पगारे, हवालदार मनोज घोडके, नंदकुमार नरोटे, पोलिस कॉन्स्टेबल जीवन पाटील, दीपक सुरोशे, शेख इरफान यांनी भायगावकडे धाव घेतली. पोलिसांनी गोपाल राठोड, गणेश भालके, अण्णा लाड,अशोक शेळके, संपत भालके, अशोक रामचंद्र शहाणे यांना ताब्यात घेतले. दरोडेखोरांनी आणलेल्या ओम्नी कारची झडती घेतली असता त्यात दोन कुèहाडी, पावडे, टिकाव असे साहित्य मिळून आले. या प्रकरणी भगवान ठोंबरे (३२, रा.भायगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोपाल राठोड (५१ रा. आरेकरा ता. जि. यादगिरा, कर्नाटक), गणेश भालके (२०), अण्णा लाड (२५ दोघे रा. सद्गुरू लॉज येवला जि.नाशिक), अशोक शेळके (३० रा. आडगाव ता. राहता), संपत भालके (३५ रा. लोणवाडी ता. निफाड), अशोक रामचंद्र शहाणे (४९, रा. हडको, येवला) व प्रकाश यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रकाश हा फरार झाला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहे. अधिक तपास फौजदार संभाजी पवार करीत आहे.