दानपेटी फोडण्याचा प्रयत्न
औरंगाबाद : राजाबाजार येथील बालाजी मंदिरातील दोन दानपेट्या फोडून त्यातील रक्कम लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. दरम्यान, मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेèयाने या चोरट्याला टिपले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अज्ञात चोरटा बालाजी मंदिरात आला. तेथे ठेवण्यात आलेल्या दोन दानपेट्यांपैकी सर्वप्रथम अलीकडच्या दानपेटीला असलेले कुलूप त्याने तोडले. दानपेटीच्या आतील बाजूने असलेले कुलूप तोडण्यासाठी त्याने खूप परिश्रम घेतले. मात्र, त्याच्याकडून ते तुटले नाही. त्यामुळे चोरट्याने आपला मोर्चा दुसèया दानपेटीकडे वळविला. त्या दानपेटीचे एकही कुलूप तो तोडू शकला नाही. शेवटी तो हतबल होऊन मंदिरातून निघून गेला. दानपेटी फोडल्याचे सकाळी दर्शनासाठी येणाèया भक्तांच्या निदर्शनास आले. याविषयीची चर्चा राजाबाजार व शहागंज परिसरात क्षणात पसरली. त्यानुसार मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी जमली. त्यानुसार राजू नंदलाल चिचाणी यांनी यासंदर्भात सिटीचौक ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिस निरीक्षक भांड व पोलिस उपनिरीक्षक विलास ताटीकोंडलवार यांनी श्वानपथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ सोबत घेऊन मंदिर गाठले.