प्रतिनिधी
औरंगाबाद : दोन लाख रुपयांच कच्चा माल पळविण्याचा प्रयत्न दोन भामटे करत होते. वेळीच त्यांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीचा ऐवज व लोडिंग रिक्षा जप्त केली आहे.
वाळूज एमआयडीसीतील स्टारवेज कंपनीसाठी लागणाèया कच्च्या मालाचे पार्सल मुंबईहून आले होते. या मालाचे पार्सल पंढरपुरातील हिमालया टड्ढॅव्हल्सममध्ये पोहचले. तेथे मिलिंद किसनराव पंडित (३२, रा. बकवालनगर), शंकर सुपडाजी वाघ (२९, रा. बकवालनगर) व त्यांच्या सोबतच्या अनोळखी व्यक्तीने टड्ढॅव्हल्सचे श्याम डोईफोडे यांना भेटून आम्ही कच्च्या मालाचे पार्सल नेण्यासाठी आलो आहोत, असे सांगितले. यातील मिलिंद यापूर्वीही अनेकदा लोडिंग रिक्षाद्वारे मालाची कंपनीत पोहच करत असल्याने डोईफोडे यांनी त्यांच्याकडे माल सुपूर्द केला. याच दरम्यान, स्टारवेज कंपनीचे स्टोअर व्यवस्थापक अंकुश आघात हे हा नेण्यासाठी हिमालया ट्रॅव्हल्समध्ये आले. त्यांना कंपनीतील माणसे माल घेऊन गेल्याचे सांगितले तेव्हा ते आश्चर्यचकीत झाले. तातडीनडे त्यांनी कंपनीचा दोन लाखांचा माल लंपास झाल्याची तक्रार पोलिस ठाणे गाठून केली. त्यानंतर पोलिसांनी लगेच तपासाची चक्रे फिरवून मध्यरात्री बकवालनगर-नायगाव येथे छापा मारला. मिलिंद किसनराव पंडित व शंकर सुपडाजी वाघ या दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन लाखांचा ऐवज व गुन्ह्यात वापरलेली लोडिंग रिक्षा जप्त करण्यात आली.