संपूर्ण आशिया खंडात झपाट्याने वाढणारे आणि विकसित होणारे शहर म्हणून औरंगाबादची नोंद आहे. भल्या पहाटे चारपासून सुरू होणारे औरंगाबादचे जनजीवन रात्री दोनपर्यंत उसासा टाकत नाही... धावपळ, कामाची लगबग सुरूच असते. गेल्या काही वर्षात औरंगाबादमध्ये वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे प्रदुषण, गोंगाटाचा त्रास औरंगाबादकरांना भेडसावू लागला आहे. औरंगाबादच्या काही प्रमुख ठिकाणांचा बारकाईने अभ्यास केला तर, वाहनांची गर्दी, ध्वनी आणि वायू प्रदुषणाने औरंगाबादला किती ग्रासले आहे, याचे दर्शन घडते. टीव्ही पत्रकार विशाल सिंग करकोटक यांनी शहरातील काही प्रमुख ठिकाणांचे व्हिडिओ चित्रिकरण करून, औरंगाबादकरांची रोजची धावपळ, वाहनांची गर्दी आणि ध्वनी- वायू प्रदुषणाचे वाढलेले प्रमाण टिपले आहे... हा खास व्हिडिओ आपल्यासाठी देत आहोत.
Home »
City top 5
» न थांबणारे औरंगाबाद...
