प्रतिनिधी
औरंगाबाद : घाटीच्या अपघात विभागातील डॉक्टरांची अरेरावी गेल्या काही दिवसांत भलतीच वाढली आहे. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक वैतागून गेले आहेत. आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही, अशा अविर्भावात हे डॉक्टर राहतात. त्यामुळे बिच्चाèया रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाèयांनी याकडे लक्ष घालून रुग्णांचा त्रास थांबवावा, अशी मागणी होत आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची एक तक्रारही वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याकडे करण्यात आली आहे.
पाठदुखीचा त्रास असल्याने मनोज हिरे अपघात विभागात दाखल झाले. त्यांच्यासोबत छावा मराठा विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन कदम होते. त्यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाèयांना त्रासाबद्दल सांगितले. त्यांनी त्यांना तासभर थांबवून ठेवले. तासाभरानंतर त्यांना चार दिवसांनंतर या, असे सांगण्यात आले. त्यामुळे कदम यांनी रुग्णास जास्त त्रास होत असल्याचे सांगितले. त्यावेळी डॉक्टरांनी अरेरावीची भाषा वापरली व सुरक्षा रक्षकांना बोलावून धक्के देऊन हाकलून देण्यास सांगितले. या घटनेनंतर त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली. तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या सहकाèयांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदन देऊन केली.